25.5 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeसोलापूरशिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर मौलाना आझाद विचार मंचचे धरणे आंदोलन

शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर मौलाना आझाद विचार मंचचे धरणे आंदोलन

सोलापूर : आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिनानिमित्त मौलाना आझाद विचार मंच तर्फे मुस्लिमांच्या शिक्षण,आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यव्यापी धरणे आंदोलन सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय समोर झाले.

अल्पसंख्याक समाजाला न्याय,हक्क अधिकार व संरक्षण देणारी संहिता १८ डिसेंबर रोजी जगाने स्वीकारली.पण दुर्दैवाने देशात आणि राज्यात मुस्लिम समाजाच्या संविधानात्मक हक्क व अधिकार देताना भेदभाव केला जात आहे, त्यांना शैक्षणिक सवलती,आरक्षण,सुरक्षा, निधीची तरतूद व झुंडशाही हत्या विरोधात शासन कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलताना दिसत नाही. १५कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समिती अस्तित्वात नाहीत,अशा परिस्थितीत आजचा अल्पसंख्यांक दिन आम्ही आंदोलन करून निषेध दिवस म्हणून साजरा करीत आहोत असे यावेळी मंचचे प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाफ यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत सरफराज शेख यांनी विचार मांडले.

धरणे आंदोलनानंतर निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना शिष्टमंडळाने लिखित निवेदन सादर केले. या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल, शहराध्यक्ष शौकत पठाण, उपाध्यक्ष इरफान महाजन,गाजियोद्दीन रिसर्च सेंटरचे समीउल्ला शेख,ओवेज सय्यद,एम.आय.एम चे प्रवक्ते कोमारोव्ह सय्यद,राजा बागवान,वंचित आघाडीचे अझरुद्दीन शेख,मो.जुनेद तंबोली अजीम मुजावर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)चे अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष वसीम बुरहान,शोएब चौधरी,जमिर शेख कॉग्रेसचे उपाध्यक्ष सुहेल पठान,अय्यूबभाई नल्लामंदू, याकूब शेख,बंदेनवाज शेख, रमजान पठाण,रऊफ पटेल, मंगळवेढ्याचे दिलावर मुजावर, मोहोळचे बिलाल शेख ,पांगरीचे एजाज सौदागर,बार्शीचे जमिल खान,माढ्याचे जहीर मणेर,सलीम मुर्शद,जमिर पटेल, सोलापूरचे कय्युम जमादार,सलाम शेख जाविद पटेल,वैरागचे निसार शेख, अहमद शेख,महामुद पठानसर,उ.सो.चे ताहेर कारभारी, जमियत उलमा-ए-हिंदचे मुश्ताक ईनामदार,साहिल अत्तार, जमीर मुलाणी,रियाज शेख, जाहीद महाजन,दत्ता जानराव, जमीर सय्यद,शुभम चव्हाण, नागा काळूखे,आमिर सय्यद चाँद सय्यद ईनामदार आदी मान्यवर उपस्थित होते..

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR