जालना : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पोटच्या लेकानेच आपल्या वडिलांची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. राहते घर विकण्यास वडिलांनी विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इब्राहिम खान मुबारक खान (वय ६0 वर्षे, रा. अक्सा मशीद परिसर) असे मयत व्यक्तीचे नाव असून, शाहरूख इब्राहिम खान (वय ३० वर्षे) असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, किरकोळ कौटुंबिक वादातून मुलाने बापाच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. जालना शहरातील गांधीनगर भागात सोमवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे. इब्राहिम खान मुबारक खान असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी मुलगा शाहरूख इब्राहिम खान यास ताब्यात घेतले आहे.
या घटनेविषयी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक असलेला शाहरूख इब्राहिम खान हा वडील इब्राहिम खान यांना राहते घर विकण्यास सांगत होता. मात्र, वडिलांचा यास विरोध होता.