24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रनव्या वर्षात बदलणार शाळांच्या वेळा

नव्या वर्षात बदलणार शाळांच्या वेळा

शिक्षणमंत्री केसरकर यांची घोषणा

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असल्यास लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती.
दरम्यान, राज्यपालांच्या या मताशी मी सहमत आहे.

परंत्ु एकट्याने याबाबत निर्णय न घेता या निर्णयासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनोवैज्ञानिक, बालरोगतज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल असेही शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले.
आता दुसरीपर्यंतची प्राथमिक शाळा नऊ वाजता होणार आहे. परंतु इतर वर्गांबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR