‘सेव्हन सिस्टर्स’च्या सुरक्षेला धोका; भारताला केले अलर्ट

ढाक्का : वृत्तसंस्था
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र सजीव वाजेद जॉय यांनी भारतासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. बांगलादेशातील सध्याचे अंतरिम सरकार देशाला कट्टरवादाकडे ढकलत असून, यामुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या (सेव्हन सिस्टर्स) सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

सजीव वाजेद यांनी म्हटले की, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार ‘जमात-ए-इस्लामी’ सारख्या कट्टरपंथी संघटनांना मोकळे रान देत आहे. बांगलादेशात पुन्हा एकदा दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सक्रिय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानशी वाढती जवळीक भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. काही बांगलादेशी नेत्यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा संपर्क तोडण्याची भाषा केल्याने खळबळ माजली आहे.

भारतीय उच्चायुक्तालयावर निदर्शने
दुसरीकडे, बांगलादेशची राजधानी ढाका येथे तणाव अधिकच वाढला आहे. शेकडो कट्टरपंथी आंदोलकांनी भारतीय उच्चायुक्तालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. जुलै युनिटी या बॅनरखाली निघालेला हा मोर्चा पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखला. या घटनेनंतर भारताने बांगलादेशच्या उच्चायुक्तांना पाचारण करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, बांगलादेशातील भारतीय दूतावास आणि कर्मचा-यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही तिथल्या सरकारची जबाबदारी आहे. तसेच, बांगलादेशात पसरवले जाणारे ‘खोटे नॅरेटिव्ह’ भारताने फेटाळून लावले असून तिथे निष्पक्ष निवडणुका घेण्याची गरज व्यक्त केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news