18.8 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeराष्ट्रीयआता काँग्रेसचे नऊच खासदार लोकसभेत उरले

आता काँग्रेसचे नऊच खासदार लोकसभेत उरले

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी खासदारांच्या निलंबनानंतर, ‘इंडिया’ आघाडीच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीत सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही. लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे केवळ नऊ खासदार उरले आहेत. त्यात माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा समावेश आहे. मंगळवारी ४९ विरोधी खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.

वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या ९५ झाली आहे. ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे लोकसभेत १३८ खासदार आहेत, त्यापैकी ४३ खासदार बाकी आहेत. १४१ निलंबित खासदारांपैकी ५७ काँग्रेसचे आहेत. त्यापैकी ४० लोकसभेचे आणि १७ राज्यसभेचे खासदार आहेत. द्रमुकच्या २१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी १६ लोकसभेचे तर ५ राज्यसभेचे खासदार आहेत. जेडीयूच्या १४ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी ११ लोकसभेचे तर ३ राज्यसभेचे खासदार आहेत.

देशात “हुकूमशाही” लागू
गेल्या आठवड्यापासून लोकसभा आणि राज्यसभेतील विक्रमी १४१ खासदारांच्या निलंबनानंतर, देशात “हुकूमशाही” लागू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारला महत्त्वाची विधेयके कोणत्याही चर्चेविना मंजूर करायची आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR