Homeमुख्य बातम्यापंजाब नॅशनल बँकेत पुन्हा रु. २,४३४ कोटींचा घोटाळा

पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा रु. २,४३४ कोटींचा घोटाळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरकारी क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनं रिझर्व्ह बँकेला ‘रफएक इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड’ (रएऋछ) आणि रफएक इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेडच्या (रकऋछ) माजी प्रवर्तकांद्वारे केलेल्या एकूण २,४३४ कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याची माहिती दिली. बँकेनं नियामक फायलिंगमध्ये, रएऋछ शी संबंधित प्रकरणातील १,२४०.९४ कोटी रुपये आणि रकऋछ शी संबंधित १,१९३.०६ कोटी रुपयांची रक्कम कर्ज फसवणूक म्हणून आरबीआयकडे नोंदवण्यात आली असल्याचे नमूद केले.

दरम्यान, पीएनबीने स्पष्ट केले की, या दोन्ही खात्यांमधील थकीत असलेल्या संपूर्ण रकमेसाठी आधीच १०० टक्के तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे बँकेच्या बॅलन्स शीटवर कोणताही अतिरिक्त परिणाम होणार नाही. सुमारे ३२,७०० कोटी रुपयांचे एकूण आर्थिक कर्ज असलेल्या या दोन्ही कंपन्या ‘इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड’ अंतर्गत निवारण प्रक्रियेतून गेल्या आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये नॅशनल असेट रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेडनं या कंपन्यांचे संपादन केले असून ती आता या कंपन्यांची नवीन प्रवर्तक आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये कथित गैरव्यवस्थापन आणि आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने रकऋछ आणि तिची उपकंपनी रएऋछ चं संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यापूर्वी कोलकाता येथील कनोडिया कुटुंब या कंपन्यांचे संचालन करत होते. या प्रकरणादरम्यान पीएनबीची आर्थिक कामगिरी मजबूत राहिली आहे. बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या सप्टेंबर तिमाहीत आपल्या निव्वळ नफ्यात १४ टक्क्यांची वाढ नोंदवत ४,९०४ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत ४,३०३ कोटी रुपये होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR