सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे श्रवणदोष असलेल्या रूग्णांची चाचणी करण्याकरीता मराठवाडा कर्नाटक व सोलापूर जिल्हयातून बरेच रुग्ण येत असतात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ई.एन.टी विभागामध्ये मागिल एका वर्षापासून बेरा मशीन (कर्णदोष निदान चाचणी मशीन ) बंद असल्याने पुणे येथे जावे लागत होते. ही अडचण नगरसेवक बाबा मिस्त्री व अधिष्ठता डॉ सुधीर देशमुख सरांनी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे राम रेडडी सरांना सांगितली. बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे संचालक मंडळाच्या वतीने सी एस आर अंर्तगत अधुनिक पध्दतीचे जी.एस.आय. अड्युरा बेरा मशीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. सिव्हिल हॉस्पीटल येथिल ई. एन.टी विभागात बेरा मशीनचे फित कापून उदघाटन बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे राम रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी .ई.एन.टी विभागप्रमुख डॉ वंदना थोरावडे मॅडम यांनी गेल्या वर्ष भरात बेरा मशीन नसल्याने रुग्णांना फार त्रास झाला व कर्णदोष चाचणी करीता रूग्णांना पुणे किंवा इतरत्र जावे लागले. काही संघटनांनी या मशीन करीता आंदोलन करण्याचे पत्र दिले होते. बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या वतीने कमी वेळात फार चांगली अधुनिक व नविन तंत्रज्ञानाची १५ लाख रूपये किमतीची बेरा मशीन उपलब्ध करून दिली व तसेच त्याकरीता आवश्यक वायरिंग व आर्थिग ची सोय करून मशीन दिल्यामुळे सोलापूरातील रूग्णांची सोय करून दिल्याबददल बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे रेडडी
सरांचे आभार मानले.
या वेळी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे राम रेड्डी यांनी बेरा मशीन चा वापर चांगल्या पध्दतीने व्हावा तसेच बेरा मशीन नसल्यामुळे रूग्णांची जी गैरसोय झाली होती कार्यकोष चाचणी करीता वेटींगवर असलेल्या रूग्णांना लवकरात लवकर चाचणी करून उपचार करावे असे सांगितले. बालाजी अमाईन्सच्या वतीने सिव्हिल हॉस्पीटल च्या आवारात नविन कॅज्युल्टी विभागाकरीता नविन इमारत बांधकाम करण्यास बालाजी अमाईन्स तयार आहे तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे परवानगी लवकर मिळाल्यास त्याचे काम लवकर सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.
अधिष्ठता डॉ सुधीर देशमुख यांनी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे संचालक मंडळ व रेड्डी परिवाराचे विषेश आभार मानले. श्रवण क्षमतेची चाचणी व निदान चाचणी तसेच श्रवण क्षमतेचे अचुक मुल्यमापन या अधुनिक बेरा मशीन मुळे होणार असल्यामुळे सोलापूरातील रुग्णांची सोय झाली असल्याचे सांगितले. या कार्यकमास मेडिसिन विभागप्रमुख डॉ. विठठल धडके, ई.एन.टी विभागप्रमुख डॉ. वंदना थोरवडे, डॉ. सुनिल हांदाळीमठ, डॉ. तोडकर वैदयकिय अधिक्षक, नगरसेवक बाबा मिस्त्री, डॉ. अमजा वरेरकर, डॉ. स्मिता चाकोते,डॉ. विढ्या तिश्नकर, ई.एन.टी विभागातील सर्व डॉक्टर व बालाजी अमाईन्स चे दत्तप्रसाद सांजेकर तसेच सिव्हिल हॉस्पीटल चे कार्मचारी वर्ग उपस्थित होते.