पुणे : हवामानात सातत्याने बदल होत आहेत. सध्या राज्यातील काही भागात थंडीचा पारा चांगलाच वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान पारा खाली घसरला आहे.
नाताळपर्यंत कोकणात देखील तापमानाचा किमान पारा खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान १२ अंशांखाली गेले आहे. सर्वांत कमी तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात हळूहळू तापमानाचा पारा घसरत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान १२ अंशांखाली गेले आहे. त्यामुळे हुडहुडी वाढली आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमान एका अंकांवर आले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. विदर्भासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.