लातूर : लातूरच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वकिली क्षेत्रात अग्रेसर असणारे व सामाजिक प्रश्नासाठी सदैव संघर्ष करणारे, पुरोगामी विचारांचे समर्थक ज्येष्ठ समाजवादी नेते अँड मनोहरराव गोमारे यांचे हृदयविकाराने दु:खद निधन झाल्याची बातमी कळाली. जनतेच्या प्रश्नासाठी सदैव संघर्ष करणारे,अग्रेसर असणारे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्तव असलेले अँड मनोहरराव गोमारे देशमुख कुटुंबाचे स्नेही होते.
त्यांच्या दु:खद निधनाने पुरोगामी विचारांचा आधारवड, संघर्षमय नेतृत्व हरवले आहे. गोमारे कुटुंबाच्या दु:खात देशमुख परिवार सहभागी आहे, असे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना विलासनगर लातूर यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, दिवंगत अॅड. मनोहररावजी गोमारे यांनी गेल्या ५० वर्षांपासून लातूरच्या राजकारणात, समाजकारणात सामाजिक कार्य करीत असताना अनेक प्रश्नांना वाचा फोडली. लोकांच्या सार्वजनिक कार्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. राजकारण, सामाजिक, शैक्षणिक, वकिली क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. एसटीचे आंदोलन असो की पाणी प्रश्नावर ते लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर यायचे. त्यांच्या जाण्याने पुरोगामी विचारांचा आधारवड आज हरवला आहे. त्यांच्या कुटुंबास दु:ख सहन करण्याची परमेश्वराकडे प्रार्थना करतो. ओम शांती.