तामिळनाडूत भाजपची रणनीती; ५६ जागा, ३ मंत्रिपदावर ठाम

चेन्नई : वृत्तसंस्था
भाजपाने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. २०२६ वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडू दौरा केला. त्यात भाजपा आणि एआयडिएमके दोन्ही पक्षात युती, जागावाटप आणि सत्ता फॉर्म्युल्याची चर्चा झाली. एआयडिएमकेचे महासचिव माजी मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीस्वामी यांची नुकतीच अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली.

या बैठकीत अमित शाह यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. भाजपाला राज्यात एकूण २३४ जागांपैकी ५६ जागा हव्या आहेत. त्याशिवाय राज्यात सरकार बनल्यानंतर ३ मंत्रि­पदांची मागणीही शाह यांनी केली आहे. या ५६ जागांमध्येच भाजपा त्यांच्या सहकारी मित्रांनाही सामावून घेईल. ज्यात एआयडिएमकेचे बंडखोर नेते ओ. पन्नीरसेल्वम आणि टी.टी.वी . दिनाकरन यांच्या नेतृत्वातील गट सहभागी आहे. त्याशिवाय तामिळनाडूत भाजपाचे काही छोटे सहकारीही आहेत. पुथिया तमिलगमसारखे पक्ष हे एनडीएचा भाग आहेत.

२०२१ च्या निवडणुकीत डिएमकेने १३३ तर एआयडिएमकेला ६६ जागा मिळाल्या होत्या. भाजपा केवळ ४ जागांवर विजयी झाली होती. एनडीएत सहभागी असणा-या पीएमकेला ५ जागा मिळाल्या होत्या. डिएमकेचा सहकारी पक्ष काँग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या. एआयडिएमके पक्षातील सूत्रांनुसार, माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी बैठकीत भाजपाला कुठलेही आश्वासन दिले नाही. पक्षात याबाबत सल्लामसलत करावी लागेल असे त्यांनी शाहा यांना म्हटले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news