हैदराबाद : वृत्तसंस्था
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी म्हटले की, लवकरच एक नवा कायदा आणणार आहे, ज्यामध्ये जे सरकारी कर्मचारी आपल्या आई-वडिलांची सेवा करत नाहीत. त्यांची उपेक्षा करत असतील तर अशा कर्मचा-यांच्या वेतनातून १० टक्के इतकी रक्कम कपात करून ती थेट त्यांच्या आई-वडिलांच्या बँकेच्या खात्यावर ट्रान्स्फर केली जाईल. तसेच वृध्द आई आणि वडिलांच्या तक्रारींचीही गांभीर्याने दखल घेतली जाईल.
मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग व्यक्तींना रेट्रोफिटेड मोटराईज्ड वाहन, बॅटरीवर चालणा-या तीन चाकी सायकल, बॅटरी व्हिलचेअर, लॅपटॉप, ऐकण्याची मशीन, मोबाईल फोन आणि आधुनिक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले. सरकारकडून वरिष्ठ नागरिकांसाठी ‘प्रणाम’ नावाने डे केअर सेंटरही स्थापन करण्यात येणार आहे.
रेवंत रेड्डी यांनी ही घोषणा केली आहे की, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय प्रस्तावांमध्ये एक नवी आरोग्य धोरण सादर केली जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील सर्व नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच, पुढील अर्थसंकल्पात नवीन आरोग्य धोरण मांडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

