१० वर्षात ‘स्टार्ट अप’ची संख्या २ लाखांवर; २१ लाख नोक-या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी इकोसिस्टम आहे. १० वर्षांपूर्वी देशात ५०० पेक्षा कमी स्टार्टअप्स होते, पण आज २ लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. भारतातील तरुणांचे लक्ष वास्तविक समस्या सोडवण्यावर आहे. आमचे तरुण नवोन्मेषक, ज्यांनी नवीन स्वप्ने पाहण्याचे धाडस दाखवले. मी त्या सर्वांचे खूप-खूप कौतुक करतो.

पंतप्रधानांनी हे विचार नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्टार्टअप इंडिया मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात मांडले. स्टार्टअप इंडिया मोहीम १६ जानेवारी २०१६ रोजी पंतप्रधानांनी सुरू केली होती. ज्याचा उद्देश नावीन्य, उद्योजकता वाढवणे आणि गुंतवणुकीमुळे होणारी वाढ सक्षम करणे हा आहे. गेल्या दशकात देशभरात २ लाखांहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता मिळाली आहे.

२०१६ मध्ये जेव्हा स्टार्टअप इंडिया सुरू झाले, तेव्हा केवळ ४०० च्या आसपास स्टार्टअप्स होते. आज या मोहिमेने एक विशाल रूप घेतले आहे आणि २ लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या स्टार्टअप्सच्या माध्यमातून आतापर्यंत २१ लाखांहून अधिक प्रत्यक्ष नोक-या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असा अंदाज आहे.

१० वर्षांत ६,३८५ स्टार्टअप्स बंद
ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यामुळे ४ युनिकॉर्न (ड्रीम ११, एमपीएल, गेम्सक्राफ्ट, गेम्स २४ इनटू ७) चा दर्जा हिरावून घेण्यात आला. डीपीआयआयटीचे संयुक्त सचिव संजीव यांच्या मते, देशात गेल्या १० वर्षांत ६,३८५ स्टार्टअप्स बंद झाले आहेत. हे एकूण स्टार्टअप्सच्या केवळ ३ टक्के आहे. हा दर जगभरात सर्वात कमी आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news