21 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeसोलापूररोजगाराअभावी तरूणांंचे सोलापूरातून स्थलांतर

रोजगाराअभावी तरूणांंचे सोलापूरातून स्थलांतर

सोलापूर : प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना अपेक्षित असतानाही २०११ नंतर लोकसंख्येचे मोजमाप झालेले नाही. २०११मध्ये सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाख १७ हजारांवर होती. आता १२ वर्षांनी त्यात वाढ होऊन जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे ५१ लाखांवर पोचली आहे. पण, शासकीय योजना अन्‌ योजनांचे बजेट तेवढेच, लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगारात वाढ नाही. पोलिस ठाण्यांची संख्या व मनुष्यबळ जैसे थे च असल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर स्थलांतर विशेषतः तरुण परजिल्ह्यात जात असल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत १८ ते २९ वयोगटातील तरुणांची संख्या तब्बल साडेअकरा लाखांपर्यंत आहे. दरवर्षी जिल्ह्यातून पाच हजार अभियंते तयार होता, पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा रोजगार स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाही. स्टार्टअप, मुद्रा योजनेअंतर्गत बँकांकडूनही उद्योग सुरु करण्यासाठी अपेक्षित मदत मिळत नाही, शासकीय योजनांसाठी निधीची मर्यादा असल्याने लाभासाठी वाट पाहावी लागते.

गावपातळीवर शेती, पशुपालनातून रोजगाराची सुविधा आहे, पण त्यातही वारंवार भावात घसरण आणि सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे दोन्ही व्यवसाय परवडत नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव अपेक्षापूर्तीसाठी अनेक तरुण मेट्रोसिटीत जात असल्याचीही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे गुन्हेगारी वाढत असून पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताणही वाढला आहे. तरीदेखील पोलिसांचे मनुष्यबळ जैसे थे च आहे. त्यामुळे आता वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून शासकीय योजना व त्यांचे बजेट आणि तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा याचा गांभीर्याने विचार करावाच लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मागील १२ वर्षांत जिल्ह्यातील एक लाख १४ हजार तरुणांना सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे. मात्र, लोकसंख्या वाढीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी असल्याचीही वस्तुस्थिती आहे. उच्च शिक्षणानंतरही स्थानिक पातळीवर सेवा, आयटी, केमिकल अशा क्षेत्रात वाढ झाली नसल्याने तरुणांचे ब्रेनडेड झाले आणि असे तरुण दुसऱ्या शहरांमध्ये स्थलांतर करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR