24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधकांनी विदर्भाच्या विकासावर प्रस्ताव मांडलाच नाही

विरोधकांनी विदर्भाच्या विकासावर प्रस्ताव मांडलाच नाही

नागपूर : विरोधी पक्षांनी संपूर्ण अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेवर एकही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशाचा आजचा शेवटचा दिवस असून नागपुरात हे अधिवेशन भरवण्यात आले. परंतु अंतिम आठवड्यातील प्रस्ताव हा विदर्भाच्या विकासावर दिला जातो, तो यंदाच्या अधिवेशनात दिला गेला नाही आणि तो विरोधी पक्षांनी मांडला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे सभागृहात बोलत नाहीत मात्र ते सभागृहाच्या बाहेर बोलतात, विधानसभेतील भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. विरोधकांना विदर्भाचा विसर पडलाय हे अत्यंत खेदजनक आहे. आम्हाला आमच्या अध्यक्षांचं ऐकावं लागतं तसं तुम्हीही ऐकलं पाहिजे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.
विरोधी पक्षाने या संपूर्ण अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेवर एकही प्रस्ताव दिला नाही. अंतिम आठवड्यात विदर्भाच्या विकासावर प्रस्ताव दिला जातो. विरोधी पक्षनेते आणि नाना पटोले यांनी तरी प्रस्ताव मांडला पाहिजे होता. उद्धव ठाकरे सभागृहात बोलत नाहीत मात्र सभागृहाच्या बाहेर बोलतात. विरोधकांना विदर्भाचा विसर पडला हे खेदजनक आहे. आम्हाला आमच्या अध्यक्षांचं ऐकावं लागतं. तसंच तुम्हीही ऐकलं पाहिजे. हा प्रस्ताव विरोधी पक्षनेते यांनी मांडला पाहिजे होता, मात्र त्यावरही अन्याय करण्यात आला.

ललित पाटील याचा कारखाना २०२० साली सुरू झाला असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात केला आहे. यावर बोलताना फडणवीसांनी म्हटले की, तुम्ही विसरला असला तरी आम्ही नाही विसरलो. नाना पटोले ड्रग्ज संदर्भात बोलले. गुजरातनंतर महाराष्ट्रात काय सुरू आहे, हे ही सांगितले. सर्वांत मोठी कारवाई महाराष्ट्रात केली गेली आहे. २४ हजार लोकांवर कारवाई करण्यात आली. मागे कारवाई ही ५ हजार लोकांवर केली होती. पण आम्ही कारवाईचे प्रमाण वाढवले. ललित पाटील प्रकरणात कृष्ण प्रकाश यांचेपत्र मी वाचून दाखवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR