25.8 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeराष्ट्रीयकेजरीवालांची ईडी चौकशीला दांडी

केजरीवालांची ईडी चौकशीला दांडी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बुधवारी (२० डिसेंबर) विपश्यना केंद्रामध्ये ध्यनासाठी गेले असून येथे ते ३० डिसेंबरपर्यंत राहणार आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी (२१ डिसेंबर) आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या समन्सवर हजर राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी ईडीच्या समन्सवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री विपश्यनेला गेले आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ते या ध्यानाच्या कोर्ससाठी नियमित जातात. ही पूर्वनिर्धारित आणि पूर्वघोषित योजना आहे. ते वकिलांचा सल्ला घेतील, ईडीला काय उत्तर द्यायचे आणि उत्तर द्यायचे की नाही हे ते ठरवतील.

गेल्या वेळी, ईडीने या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवले होते आणि त्यांना २ नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु यादरम्यानही ते हजर झाले नाहीत आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येथे पोहोचले. भाजप हे सर्व सूडाच्या राजकारणाखाली करत आहे. केजरीवाल यांनी ईडीला पत्र लिहून हे बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR