बीड : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळ लातूर- अंबाजोगाई रोडवर एक कार जळून खाक झाली आहे. अचानक आग लागल्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेत चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळ लातूर-अंबाजोगाई रोडवर एक कार जळून खाक झाली आहे. यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला आहे. कारमध्ये होरपळलेल्या या व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नाही. ही व्यक्ती स्त्री आहे की पुरुष? याचा देखील तपास पोलिस करत आहेत. आतापर्यंतच्या पोलिस तपासात ही कार लातूर येथील एका व्यक्तीची असल्याचे समोर आले आहे.
दुर्घटनाग्रस्त कार २० डिसेंबर रोजी संध्याकाळच्या वेळी अंबाजोगाईहून लातूरकडे जात होती. एका पेट्रोलपंपावर ही कार येऊन थांबली. बर्दापूरजवळ असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळ कार येताच या कारने अचानक पेट घेतला. अचानक आग लागली, काही क्षणांत कार जळून खाक झाली. यामध्ये कारमधील एका व्यक्तीचाही होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बर्दापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन भेट घेतली. यावेळी कारमध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्या व्यक्तीची ओळख देखील पटली नसून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.