25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeराष्ट्रीयगुजरातमधील उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक

गुजरातमधील उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक

नवी दिल्ली : व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ च्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलियर्स इंडियाने भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा सविस्तर अभ्यास अहवाल जारी केला आहे. यामध्ये त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, २०२५-२६ पर्यंत भारतीय उत्पादन बाजार १ ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठू शकतो. परंतु यात गुजरातचा सर्वाधिक वाटा असणार आहे. २०२३ मध्ये गुजरातमधील उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक झाली असून याबाबतीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे.

उत्पादन क्षेत्रात गुतुवणुकीच्या बाबतीत गुजरातनंतर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून तमिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे. कॉलियर्स इंडियाच्या प्रमुखांनी म्हटले आहे की, नवीन औद्योगिक धोरणांतर्गत, गुजरात उत्पादन क्षेत्रासाठी सुमारे ३४.७ टक्के प्रोत्साहन आणि नफ्याचे वाटप करते. आणि इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी सरासरी सेटअप खर्च आहे. म्हणूनच गुजरातने २०२३ मध्ये देशी आणि विदेशी उत्पादकांकडून ३०,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक मिळविली आहे. गुजरातमध्ये येणारी ही गुंतवणूक राज्यातील औद्योगिक पाऊलखुणा मजबूत करेल.

आजही गुजरात हे देशातील आघाडीचे उत्पादन केंद्र आहे. अहवालानुसार, गुजरातच्या यशामागे अनेक कारणे आहेत, जी धोरणे, संसाधने आणि गुंतवणुकीला अनुकूल वातावरण यांचे धोरणात्मक संयोजन दर्शवते. या अभ्यासानुसार, गुजरात प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के खर्चावर ५० कोटी रुपयांच्या कॅपिंगसह सामान्य पर्यावरणीय पायाभूत सुविधा पुरवतो. याव्यतिरिक्त, गुजरात जमिनीच्या वापराच्या रूपांतरणासाठी सवलतीचे दर देते जे गुंतवणूकदारांना येथे गुंतवणूक करण्यास आकर्षित करते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR