मुंबई : एम. एस. धोनीचा विश्वासू गोलंदाज, चेन्नईचा हुकमी एक्का तुषार देशपांडे आज विवाहबंधनात अडकला आहे. कल्याणमध्ये तुषार देशपांडे याचं लग्न पार पडलं. तुषार देशपांडे याने नभा गंडामवार हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. गतवेळच्या आयपीएल स्पर्धेत तुषार देशपांडे याने भेदक मारा केला होता. चेन्नईच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली होती.
सीएसकेला आयपीएलची पाचवी ट्रॉफी मिळवून देण्यासाठी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याचे योगदान महत्त्वाचे राहिले. आयपीएल २०२४ आधी तुषार देशपांडे क्लीन बोल्ड झाला आहे. आज (गुरुवार, दि. २१ डिसेंबर) तुषार देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
सीएसकेला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर तुषार देशपांडेने फॅशन डिझायनर नभा गंडामवार हिच्यासोबत साखपुडा केला होता. आज तो लग्नबंधनात अडकला आहे. कल्याणमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला.
आयपीएलच्या १६ व्या हंगामात तुषारने प्रभावी कामगिरी केली. तो पर्पल कॅपच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर होता. तुषारने यंदाच्या हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.