पाटणा : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना पाटणा उच्च न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाशी संबंधित खटला फेटाळून लावला आहे. वृत्तानुसार, हे प्रकरण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सिद्धू यांच्या कथित वादग्रस्त भाषणाशी संबंधित होते.
या प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धू यांनी कटिहार जिल्ह्याच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. एसीजीएम न्यायालयाने १२ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेल्या आदेशात या प्रकरणाची दखल घेतली होती. निवडणुकीच्या रॅलीत केलेल्या भाषणाबाबत सिद्धू यांच्याविरुद्ध जिल्ह्यातील बारसोई पोलीस ठाण्यात आयपीसी आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.