धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बु. येथे पतीने पतीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता तीर्थ बु. येथे घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाणे येथे पती व आजी सासूच्या विरोधात दि. २० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील तिर्थ बु. येथे आरोपी विकास बापजी माडजे (पती), मुद्रीका माडजे, (आजी सासु) या दोघांनी शितल विकास माडजे (वय २३) यांच्या अंगावर कौटुंबिक कारणावरून पेट्रोल टाकून पेटवून दिले. शितल माडजे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर पेट्रोल टाकुन काडीपेटीनेआग लावली. यामध्ये त्या जळून गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी शितल माडजे यांनी दि. २०डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे येथे कलम ४९८ (अ), ३०७, ३२३, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.