लातूर : प्रतिनिधी
हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुर्गाप्पा काशिनाथप्पा खुमसे यांचे दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०५ वर्षांचे होते. स्व. मुर्गाप्पा खुमसे यांच्या पार्थिवावर आज दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी रेणापूर तालुक्यातील बेलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा शिवराज, तीन मुली, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते लातूर शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापूरे यांचे चुलते होत.
हैद्राबाद स्टेट काँग्रेस कृती समितीच्या आदेशानुसार ३ व १५ ऑगष्ट १९४७ रोजी प्रभात फेरी काढून रेणापुर येथील पोलीस चौकी पुढे झेंडा सत्यागृह करण्यात आला व कायदा भंग आंदोलनाच्या प्रचारसभा मुर्गाप्पा खुमसे यांनी घेतल्यामुळे त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट निघाले. असता भूमिगत झाले. खुमसे यानी रेणापुर पोलीस चौकीतील हत्यारे पळवण्यिाचा कट तयार केला त्यानुसार पोलिस चौकीत दोन टवेलबोर, बंदुका बायोनेटसह पळवल्यिा. हैदराबाद मुक्ती लढ्यातील त्यांचे योगदान खुप मोठे आहे. त्यांच्या निधानाने रेणापूर, लातूर परिसरावर शोककळा पसरली आहे.