28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरवाळू उपशाविरुध्द वाळवंटातील खड्ड्यात झोपून आंदोलन

वाळू उपशाविरुध्द वाळवंटातील खड्ड्यात झोपून आंदोलन

पंढरपूर – येथील चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिर ते जुना दगडी पूल या ठिकाणी अवैध वाळू उपसा झाल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे वारकऱ्यांचा जीव गेला आहे. या प्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जागे करण्याच्या उद्देशाने महर्षी वाल्मीकी संघटनेच्यावतीने चंद्रभागेच्या वाळवंटातील खड्ड्यात झोपून आंदोलन करण्यात आले.

पंढरपूर शहर व तालुक्यात राजरोसपणे अवैधरीत्या होणारा वाळू उपसा हा तालुक्यातील व शहरातील जनतेला माहीत आहे. संघटनेने याबाबत विविध आंदोलने करुन महसूल प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा अधिकाऱ्यांची केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी व जर दोषी आढळले तर संबधितांना तातडीने निलंबन करावे, अशी मागणी महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली.

दरम्यान या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क वाळवंटातील खड्ड्यातच झोपून घोषणाबाजी केल्या. यावेळी भारत खेडेकर, धनंजय परचंडे, अनिल पवार, दत्तात्रय कोळी, सोपान अंकुशराव, भैया कांबळे, उमेश तारापुरकर, बाळासाहेब सावतराव, चंगू नेहतराव, धोंडिबा नेहतराव, पोपट खेडेकर, पिंटू करकमकर, अजय अभंगराव, वैभव माने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR