सोलापूर : अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर येथील नवजात शिशुरोग तज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांचे चिरंजीव अश्विन कुलकर्णी यांची भारताच्या अंडर १९ विश्व कप साठी संघामध्ये निवड झालेली आहे. तसेच आयपीएल 2024 च्या लखनौ क्रिकेट संघामध्येही निवड झालेली आहे.
यानिमित्त अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये अश्विन कुलकर्णी याचा सत्कार चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी कुलकर्णी दाम्पत्याचाही सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. अतुल कुलकर्णी यांची सुकन्या डॉ.सौ.ऐश्वर्या यांचा सत्कार संचालक डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र घुली केले व अश्विन यांच्याबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी डॉ. मुकूंद राय, डॉ. किरण जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.अतुल कुलकर्णी यांनी अश्विनच्या लहानपणापासून क्रिकेटच्या आवडीबद्दल व त्याच्या परिश्रमाबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. चेअरमन बिपीनभाई पटेल यांनी .अश्विनबद्दल गौरवोद्गार काढून त्याच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. क्रिकेटमध्ये सोलापूरचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल अभिनंदन केले. .संचालक डॉ. विजय पाटील यांनी कुलकर्णी यांचे कौतुक करुन अश्विनच्या प्रगती व भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत औरंगाबादकर यांनी अश्विन यांस शुभेच्छा देऊन आभार प्रदर्शन व्यक्त केले.
याप्रसंगी अश्विनीचे संचालक वेणुगोपाळ तापडीया, जयेशभाई पटेल, मेहूल पटेल, श्रीमती यशोदाबाई डागा, इंदुमती अलगोंड, . अशोक लांबतुरे, .विलास पाटील आणि डॉ. विद्यानंद चव्हाण, डॉ. निर्मल तापडीया, डॉ. श्रीराम अय्यर, डॉ. सुर्यप्रकाश कारंडे, डॉ. अनुराधा कारंडे, डॉ. वैशाली दबडे, डॉ. रामचंद्र विन्नू, डॉ. गुणवंत चिमणचौडे, प्रशासकीय अधिकारी .सचिन बिज्जरगी आदी उपस्थित होते. यावेळी अश्विनीचे अधिकारी, हाऊसमन, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.