35.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात हुडहुडी!

राज्यात हुडहुडी!

पुणे : राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला आहे. एकीकडे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळत असून उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. मैदानी प्रदेशातून वाहणा-या थंड वा-यांमुळे महाराष्ट्रातील तापमानातही कमालीची घट झाली आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहेत. पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २५ डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होईल त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे.

राज्यात आठवडाभर कोरडे वातावरण राहणार असून हवेत कमालीचा गारवा जाणवेल. जळगाव जिल्ह्यात सध्या थंडीची लाट सुरू आहे. जळगावमध्ये तापमान १० अंशापर्यंत खाली घसरले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी ऊबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासूनच गुळाचा चहा, मिरची भजे आणि झणझणीत मिसळ खाण्यासाठी जळगावकरांनी गर्दी केल्याचे चित्र जळगावमध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे.

अवकाळी पावसानंतर वातावरणात कमालीचा गारवा
हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण, प्रचंड थंडी त्याचबरोबर धुक्याची दाट पसरलेली चादर यामुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाल्याचे पाहायला मिळते. धुके इतके दाट प्रमाणात होते की, अगदी २०० मीटर पर्यंतही दिसत नव्हते. दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, त्यामुळे याचा फटका सकाळी हिंगोली शहरात येणारे दूधवाले, शाळकरी मुले, यासह भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणारे शेतकरी यांना बसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR