24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीय६ वर्षात २५ लाख मुली आणि महिला बेपत्ता

६ वर्षात २५ लाख मुली आणि महिला बेपत्ता

नवी दिल्ली : देशात महिलांच्या विरोधात होणारे गुन्हे सतत वाढत आहेत. गेल्या सहा वर्षांत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २५ लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. या कालावधीत पोलीस केवळ १३७२६३५ मुली व महिलांपर्यंत पोहोचू शकले आहेत, म्हणजेच त्यांचा शोध पोलिस लावू शकले. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी नुकत्याच संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली होती. २०१७ ते २०२२ पर्यंत महिला अपहरणाचे ४३४७०२ गुन्हे दाखल झाले आहेत.

२०१७ मध्ये ७७५२३ अल्पवयीन (१८ वर्षाखालील) मुली बेपत्ता झाल्या. या काळात ४६७९८ मुलींचा शोध लागला. १८ वर्षांपेक्षा जास्त २८३४२८ महिला याच काळात बेपत्ता झाल्या. या कालावधीत १४१४७५ महिलांचा शोध घेतला गेला. तसेच २०१८ मध्ये ७७९५२ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. या काळात ४८७८७ मुलींचा शोध लागला. १८ वर्षांपेक्षा जास्त ३०६७३३ महिला याच काळात बेपत्ता झाल्या. त्यापैकी १६१११० महिलांचा शोध घेतला गेला. तसेच २०१९ मध्ये ८२०८४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. या काळात ४८७१६ मुलींचा शोध लागला. १८ वर्षांपेक्षा जास्त ३४२१६८ महिला याच काळात बेपत्ता झाल्या. त्यापैकी १७४२६९ महिलांचा शोध घेतला गेला.

तसेच २०२० मध्ये ७९२२९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. या काळात ४८७१६ मुलींचा शोध लागला. १८ वर्षांपेक्षा जास्त ३४४४२२ महिला याच काळात बेपत्ता झाल्या. त्यापैकी १७५२२६ महिलांचा शोध घेतला गेला. तसेच २०२१ मध्ये ९०१२३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. या काळात ५८९९० मुलींचा शोध लागला. १८ वर्षांपेक्षा जास्त ३७५०५८ महिला याच काळात बेपत्ता झाल्या. त्यापैकी २०२२९८ महिलांचा शोध घेतला गेला. तसेच २०२२ मध्ये ९४०७९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. या काळात ६०२८१ मुलींचा शोध लागला. १८ वर्षांपेक्षा जास्त ४०३३१४ महिला याच काळात बेपत्ता झाल्या. त्यापैकी २०५९६९ महिलांचा शोध घेतला गेला.

दररोज ११६७ मुली आणि महिला बेपत्ता
दिवसांच्या संदर्भात पाहिल्यास, २१९० दिवसांपासून दररोज ११६७ मुली आणि महिला बेपत्ता आहेत. या काळात पोलीस दररोज ६२६ मुली व महिलांपर्यंत पोहोचत आहेत. एका वर्षात बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांच्या संख्येत मागील वर्षांतील प्रकरणांचीही भर पडली आहे.

अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद
२०१७ मध्ये – ६६३३३
२०१८ मध्ये – ७२७०९
२०१९ मध्ये – ७२६८१
२०२० मध्ये – ६२३००
२०२१ मध्ये – ७५३६९
२०२२ मध्ये – ८५३१०

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR