हापूस आंब्याची आवक वाढली; दरात घसरण

मुंबई : प्रतिनिधी
कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे आंबा खवय्यांना आता हापूसचा आस्वाद घेणे सुलभ होणार आहे. अक्षय्य तृतीयेमुळे बाजारात आंब्याची आवक वाढली आहे

. यंदा मात्र बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन सुमारे ८० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बाजारात हापूसची आवक अत्यल्प होती. त्यामुळे दर चढे राहिल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आंबा परवडत नव्हता. एप्रिल-मे हा हापूसचा मुख्य हंगाम मानला जातो. या कालावधीत उत्पादन आणि आवक वाढल्याने दर नियंत्रणात येतात. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपर्यंतही आवक कमीच होती.

बाजारात दररोज केवळ ८ ते १० हजार पेट्यांची आवक होत होती. १० एप्रिलनंतर आवक वाढेल, असा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आता आवकेत हळूहळू वाढ होत आहे. गुरुवारी वाशी बाजारात हापूस आंब्याच्या सुमारे ८० हजार पेट्यांची आवक झाली, जी यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली आहे. त्यामध्ये कोकणातील ५० हजार पेट्या तर इतर राज्यातील हापूसच्या ३० हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे व्यापा-यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आवक वाढल्याने घाऊक बाजारातील दरातही घट झाली आहे. यापूर्वी दोन ते पाच डझन कच्च्या आंब्याच्या पेट्यांचे दर २००० ते ५००० रुपयांदरम्यान होते. सध्या हे दर १५०० ते ४५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पिकलेल्या आंब्यांचे दर यापेक्षा अधिक आहेत. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदाची एकूण आवक कमी असली तरी सध्या वाढलेली आवक आणि घसरलेले दर यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56
Video thumbnail
Manoj Jaramge Andolan|मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद; लातुरात मराठा समाजाचा रास्ता रोको
01:35
Video thumbnail
Latur|जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32 टक्के पाणी साठा;अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा.
03:04
Video thumbnail
Latur|डिझेल संपलं! लातूर जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट
02:29
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचा CBI तपास...
04:33
Video thumbnail
Latur|माजी आमदार धिरज देशमुखांच्या पुढाकाराने कॅनॉलला पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
02:35
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58
Video thumbnail
नांदेडमध्ये काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात हल्लाबोल;बैलगाडीतून दुचाकी नेत काँग्रेसचं अनोखं आंदोलन
02:09
Video thumbnail
Himayatnagar|नगराध्यक्ष उतरले थेट श्रमदानात!;हिमायतनगरच्या पाणीप्रश्नावर तोडगा
01:37
Video thumbnail
Latur\खंडापूर सप्ताहातील दानरक्कम घेऊन महाराज गायब?;“किशोर महाराजांना अटक करा” ; वारकऱ्यांचा आक्रोश
02:52
Video thumbnail
Latur|लातुरात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
07:20

Latest news