नवी दिल्ली : ब्रिटिश सागरी सुरक्षा कंपनी एम्ब्रेलाने वृत्तसंस्थेला सांगितले की, भारताच्या पश्चिम किनार्याजवळ इस्रायलच्या एका व्यावसायिक जहाजावर हवाई हल्ला करण्यात आला आहे. जहाजावर हल्ला झाला तेव्हा ते पोरबंदर किनाऱ्यापासून २१७ मैलांवर होते. गाझा युद्ध सुरू झाल्यापासून लाल समुद्राबाहेर मालवाहू जहाजावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे.
भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या इच्छेने वृत्तसंस्थेला सांगितले की, क्रू आणि जहाजाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. अतिरिक्त मदत देण्यासाठी भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक जहाजे व्यापारी जहाजांकडे जात आहेत. एमव्ही केम प्लूटो असे या टँकरची ओळख पटली असून ते सौदी अरेबियातून कच्चे तेल घेऊन जात होते. टँकरमध्ये सुमारे २० भारतीय होते.