‘जीएसटी’मुळे तिजोरीत २.४३ लाख कोटींची विक्रमी कमाई

नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्था संकटात असतानाही भारताने देशांतर्गत प्रगतीत चांगली कामगिरी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एप्रिल महिना अत्यंत आश्वासक ठरला आहे. एकूण जीएसटी संकलनात वार्षिक ८.७% वाढ झाली असून आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक नोंदवला गेला आहे. मागील वर्षी एप्रिल २०२५ मध्ये हा आकडा २.२३ लाख कोटी रुपये होता. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांचा वाटा सर्वाधिक आहे.

सरकारी तिजोरीत एप्रिल २०२६ मध्ये सुमारे २.४३ लाख कोटी रुपये जीएसटी जमा झाला. देशांतर्गत व्यवहारातून १.८५ लाख कोटी रुपये मिळाले असून, त्यात ४.३% वाढ झाली आहे. तर आयातीतून मिळणा-या जीएसटीमध्ये २५.८% ची मोठी वाढ होऊन तो ५७,५८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये केद्रीय जीएसटी ५२,१४० कोटी रुपये, राज्यांचा वाटा ६१,३३१ कोटी रुपये इतका आहे. तर एकात्मिक जीएसटी ७१,६५१ कोटी रुपये जमा झाले. परताव्याच्या बाबतीतही एप्रिलमध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ३१,७९३ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला, जो मागील वर्षाच्या तुलनेत १९.३ टक्क्यांनी जास्त आहे.

सर्व परतावे वजा जाता निव्वळ जीएसटी संकलन २.११ लाख कोटी रुपये इतके झाले आहे. या परताव्यांमध्ये देशांतर्गत परताव्यांत ५४.६ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली असली तरी, निर्यात संबंधित परताव्यामध्ये मात्र १४ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. राज्यांच्या महसुलातील ही तफावत देशातील आर्थिक सुधारणेचा आणि उपभोग यातील व्यस्त प्रमाण दाखवते.

महाराष्ट्र पुन्हा अव्वल
राज्यांच्या कामगिरीचा विचार करता महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी राज्य जीएसटी संकलनात मोठी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राने वार्षिक ४० टक्क्यांची भरघोस वाढ नोंदवली असून कर्नाटकने ४२ टक्क्यांच्या वाढीसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तेलंगणा राज्यानेही ३६ टक्क्यांच्या वाढीसह आपली आर्थिक गती कायम राखली आहे, तर पुद्दुचेरीमध्ये तब्बल १०८ टक्क्यांची विक्रमी वाढ दिसून आली. दुसरीकडे, लडाखमध्ये संकलनात ८ टक्क्यांची घट झाली असून झारखंडमधील वाढ स्थिर राहिली आहे.

आर्थिक वर्षातील आकडा
संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी एकूण जीएसटी संकलन मागील आर्थिक वर्षातील (२०२५) २०.५५ लाख कोटी रुपयांवरून ८.३ टक्क्यांनी वाढून २२.२७ लाख कोटी रुपये झाले. निव्वळ जीएसटी संकलन १९.३४ लाख कोटी रुपये होते, जे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत ७.१% नी वाढले आहे.

विक्रमी जीएसटी संकलन
– एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाने २.४२ लाख कोटींचा विक्रमी उच्चांक गाठला.
– हे संकलन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा ८.७% जास्त आहे.
– गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जीएसटी संकलन २.३७ लाख कोटी होते.
– निव्वळ जीएसटी संकलन देखील ७.३% वाढून २.११ लाख कोटी रुपये झाले.
– महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश आघाडीवर आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|मायक्रो फायन्सच्या कर्जातून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नेमकं सांगितलं?
01:22
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे ऊस जळून खाक #breakingnews #marathinews
01:05
Video thumbnail
Nanded|खासदारांच्या गावातच मायक्रो फायनान्सचा वसुलीचा तगादा? महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
04:15
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा परिषदेत अनागोंदी कारभाराचा आरोप! आशाताई भिसेंनी मांडले कागदपत्रे
03:55
Video thumbnail
Nanded|नांदेड शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरण: तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, संचालक फरार
01:00
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पाणीचोरीविरोधात मोठी कारवाई! २८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या, पाइप जप्त
02:24
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ महोत्सव! महिला उद्योजिका पॉवर बाजार ३० ऑक्टोबरपासून
02:35
Video thumbnail
Latur|लातूर बसस्थानकात घाणीचं साम्राज्य! काँग्रेसची पाहणी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न
07:52
Video thumbnail
Latur|लातूर रोडवर कबीर गॅरेजमध्ये चोरी! ऑक्सिजन सिलेंडर लंपास, चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल
01:05
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी | हैबतपूर शिवारातील घटना
00:59
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये साडेचार कोटींचं बसस्थानक तयार, उद्घाटन कधी? | विद्युत फिटिंगचं काम रखडलं
01:00
Video thumbnail
Nanded|केएफ फायनान्स आणि कुबेरफल एकच? शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
02:13
Video thumbnail
“नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” अशोक चव्हाणांचा संतप्त सवाल #breakingnews #digitalekmat
00:27
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाविरोधात मोर्चा | आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर
01:43
Video thumbnail
Latur|बेलगावात शॉर्टसर्किटमुळे ऊसपिकाला आग |३ एकर ऊस जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान #breakingnews
01:05

Latest news