मुंबई: मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरामध्ये एकाने अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. गोळीबाराच्या घटनेतील जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेत सोळा ते सतरा राऊंड फायर झाल्याचं सांगितलं जात आहे. एका गुंडाचा दुस-याशी पूर्ववैमनस्यातून वाद झाला आणि नंतर गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिस घटनास्थळी पोहोचले असून वेगाने तपासकार्य सुरु आहे. ज्या भागात हा गोळीबार झाला तो रहिवासी भाग आहे. त्यामुळे परिसरात भीतीचें वातावरण पसरलं आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.