21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयवर्षअखेर मोदींचा कार्यक्रमांचा धडाका

वर्षअखेर मोदींचा कार्यक्रमांचा धडाका

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असून त्यापूर्वी ३० डिसेंबरला येथील विमानतळाचेही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर मोदी अयोध्येत रोड शो करणार असून नंतर एक सभाही घेणार आहेत.

राम मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी २२ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी अयोध्येचाही कायापालट करण्यात आला आहे. अयोध्येत नवीन विमानतळ उभारण्यात आले असून रेल्वेस्थानकाचाही पुनर्विकास करण्यात आला आहे. मोदी हे ३० डिसेंबरला अयोध्येत येणार असून यावेळी ते विमानतळ आणि रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करतील. विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांच्यातील अंतर १५ किलोमीटरचे आहे. विमानतळावरील कार्यक्रम झाल्यावर पंतप्रधान मोदी याच मार्गावरून रोड शो करत रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती अयोध्येचे जिल्हा न्यायदंडाधिकारी नितीशकुमार यांनी सांगितले.

रोड शोच्या मार्गावर विविध ५१ ठिकाणी मंडप उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी विविध साधूसंत पंतप्रधानांना आशीर्वाद देतील. रेल्वे स्थानक ते विमानतळ या मार्गावरील पाच किलोमीटरच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR