32.5 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeक्रीडालाईव्ह मॅचमध्ये विषारी सापाची एन्ट्री

लाईव्ह मॅचमध्ये विषारी सापाची एन्ट्री

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा साप आल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. भर सामन्यात सापाने एन्ट्री केल्याने अनेकदा सामना थांबवून सापाला सन्मानाने बाहेर काढले जाते. क्रिकेटनंतर टेनिसच्या कोर्टमध्ये साप निघाल्याचा व्हीडीओ समोर आला आहे. साप दिसला आणि प्रेक्षकांनी आरडाओरडा केला. शेवटी सामना थांबवावा लागला, सापाला रेस्क्यू करण्यात आले, तोपर्यंत सामना थांबवण्यात आला होता.

ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटच्या पात्रता फेरीच्या सामन्यावेळी हा प्रकार घडला. जवळपास ५० सें.मी. लांब असलेला विषारी साप टेनिस कोर्टजवळ आला होता. बॉल बॉय यांच्यापासून काही अंतरावर साप आढळला होता. यावेळी माजी अमिरिका ओपन चॅम्पियन डोमिनिक थिएम आणि २० वर्षीय जेम्स मैककाबे यांच्यात सामना सुरू होता. सामन्यादरम्यान निघालेला साप हा प्रेक्षकांना दिसला. त्यांनी लगोलग सुरक्षा रक्षकांना याची माहिती दिली. ऑस्ट्रेलियातील हा सर्वांत विषारी असलेल्या सापांपैकी एक मानला जातो.

साप कोर्टवर आल्यावर खेळाडू आणि प्रेक्षकही घाबरले होते. साप कोर्टवर सरपटत होता, सुरक्षा रक्षकांनी सापाला रेस्क्यू केले. यामध्ये जवळपास ४० मिनिट खेळ थांबवण्यात आला होता. दरम्यान, डोमिनिक थिएम याने २-६, ७-६, ६-४ विजय मिळवला आहे. आता त्याचा राफेल नदाल याच्याशी सामना असणार आहे. साप निघाल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR