पुर्णा : १८१ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय डॉ दीपक हरके यांनी आपला भाचा नीरज नवनाथ घोंगडे याला लग्नात १३७५ गुलाबांच्या फुलांचा विश्व विक्रमी गुच्छ देऊन आगळे वेगळे गिफ्ट दिले.
आज पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी येथील रागा पैलेस मध्ये नीरज घोंगडे याचा विवाह प्रतीक्षा उडगे हिच्या बरोबर संपन्न झाला. यावेळी या जोडप्याला १३७५ गुलाबांच्या फुलांचा विश्व विक्रमी गुच्छ नीरजचे आजोबा सुरेश विश्वनाथ हरके व आजी संगीता सुरेश हरके यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी डॉ दीपक हरके, नीरजचे वडील नवनाथ घोंगडे, आई ज्योती घोंगडे, अनिकेत हरके, विहान हरके, सुप्रिया हरके, रमेश कुदरी, सुमित कुदरी, स्वाती कुदरी यांचे सह नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये झाली आहे. विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डस चे आंतरराष्ट्रीय सचिव डॉ दीपक हरके यांच्या हस्ते नीरज व प्रतीक्षा ला देण्यात आले. डॉ दीपक हरके यांच्या संकल्पनेतून नगरच्या शुभ फ्लॉवर्स अँड डेकोरेटर्स ने हा विश्व विक्रमी गुच्छ बनविला आहे. डॉ दीपक हरके यांचा हा १८२ वा विश्वविक्रम आहे.