पुणे: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे अनेक तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार मदन बाफना यांच्यात आपापल्या नेत्यांवरून खडांजगी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात मदन बाफना यांनी केलेल्या टीकेला सुनील शेळके यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. बाफना साहेब माझ्या नेत्याबद्दल बोलू नका, नाहीतर तुमचा हिशेब मी काढेल, अशी तंबीच सुनील शेळके यांनी मदन बाफना यांना दिली आहे. मावळ तालुक्यात अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. त्यात सुनील शेळके यांनी ही तंबी दिली आहे.
मदन बाफना यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, शरद पवार आमचे नेते आहेत. आजकाल बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिलेली नाही. बापाला विसरायचे नसते. संस्कार सगळ्यांनी सोडले आहेत. असे संस्कार सोडलेल्या लोकांना मी बोलून दाखवणारं असे मदन बाफना म्हणाले होते.
तुमचा काळ हा वेगळा होता : आ. सुनील शेळके
यावेळी सुनील शेळके म्हणाले की, मला बाफना साहेबांना विनंती करायची आहे की, तुम्हाला देखील मावळच्या माय बाप जनतेने डोक्यावर घेतले. तुमचा काळ हा वेगळा होता आमचा काळ वेगळा आहे. आमची भूमिका तुम्हाला पटली नसेल तर तुम्ही तुमची भूमिका घ्या. परंतु दादांना, सुनील शेळके किंवा राष्ट्रवादी पक्षाला चुकीच्या पद्धतीने बोलू नका. चुकीचे स्टेटमेंट करू नका.