लातूर : प्रतिनिधी
‘हिट अॅण्ड रन’ च्या संदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला विरोध म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रक चालकांनी देशभरात रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. पेट्रोलची वाहतूक करणारे टँकर चालकही आंदोलनात सहभागी झाल्याने आता पेट्रोल मिळणारच नाही, असे होणी तरी सांगीतले आणि हा हा म्हणता शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर दुचाकी वाहनांची तोब्बा गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत पेट्रोलसाठी दुचाकी वाहनधारक धावपळ करता दिसत होते.
एखादा अपघात झाल्यानंतर वाहनचालकाने न थांबता निघून गेल्यास त्यास अटक करण्याची तरतूद ‘हिट अॅण्ड रन’ च्या संदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या कायद्यात करण्यात आल्याने देशभरातील ट्रक चालकांनी दि. १ जानेवारीपासून आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे मालवाहतूक करणारे ट्रक, पेट्रोल, डिझेल वाहतूक करणारे टँकर, दुधाचे टँकर व इतर सर्व प्रकारची मोठी वाहने जागच्या जागी थांबुन आहेत. त्यामुळे नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ट्रक चालकांचे आंदोलन लवकर नाही थांबल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीवर त्याचा परिणाम होऊन सर्वत्र हाहाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ट्रक, टँकर चालकांच्या आंदोलनाच ेपडसाद सर्वत्र उमटत असताना दिसत आहेत. लातूर शहरातही हे दिसून आले. ट्रॅक चालकांच्या आंदोलन सुरु आहे. ते कधी थांबेल हे सांगता येत नाही. त्यामुळे यापुढे पेट्रोल, डिझेल मिळणारच नाही, सध्या उपलब्ध असलेले पेट्रोल, डिझेल वाहनात भरावे, या विचाराने वाहन धारकांनी सोमवारी लातूर शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर तोब्बा गर्दी केली होती. पेन्सलवार, कामदार, शहा, कावळे या सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा पेट्रोल पंपावर होत्या.