29.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeसोलापूरपंढरपूर शहरात कारमध्ये पकडली हातभट्टीची दारू

पंढरपूर शहरात कारमध्ये पकडली हातभट्टीची दारू

पंढरपूर—राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने सोमवारी पंढरपूर शहरात एका कारमधून 360 लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंद केला. सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध देशी विदेशी दारू, हातभट्टी दारू, परराज्यातील दारू विरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकाने पंढरपूर शहराच्या हद्दीत दीनदयाल यासनारायण मंदिराच्या पाठीमागे एका कार क्र. एमएच 04 सीटी 5501 मधून तीनशे साठ लिटर हातभट्टी दारू वाहतूक होताना पकडली. या कारवाईत तानाजी मारुती कदम, वय 31 वर्षे, राहणार विठ्ठलवाडी विसावा ता. पंढरपूर या इसमास ताब्यात घेण्यात आले असून त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईत अठरा हजार चारशे रुपये किमतीच्या हातभट्टी दारू सह एकूण एक लाख त्र्याण्णव चारशे किमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान विजयकुमार शेळके व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR