लातूर : प्रतिनिधी
येथील चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजमध्ये दि. २९ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय रुग्ण समुपदेशन चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेच्या वैष्णवी बुद्रुके व सिद्धेश्वर वाळुकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दयानंद इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीच्या शुभम कांबळे व सागर धिंडोळे यांनी द्वितीय तर फार्मसी कॉलेज सोलापूरच्या सूरज गायकवाड व शांभवी धडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तीन ठिकाणी औषधी दुकानाची प्रतिकृती तयार करुन स्पर्धेत सहभागी विविध फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. रुग्ण समुपदेशन स्पर्धा हा अभिनव उपक्रम असून फार्मसी व वैद्यकीय क्षेत्रासाठी तो दिशादर्शक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संस्थेचे सचिव भीकाशंकर देवणीकर, महाराष्ट्र औषधी व्यवसाय परिषदेचे सदस्य मनोहर कोरे, जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष रामदास भोसले, विजयकुमार मठपती, अरुण हलकुडे, प्राचार्य डॉ. संजय थोंटे, प्राचार्य डॉ. विजयेंद्र स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, बारामती, पुणे, सोलापूर, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव व पुसद भागातील फार्मसी कॉलेजच्या ६१ संघांनी भाग घेतला. नागेश स्वामी, जयप्रकाश रेड्डी, कीर्ती सुवर्णकार, प्रा. विद्या येलम, डॉ. शिवकुमार लद्दे व डॉ. ऋतुजा लंकाळे यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. प्रताप भोसले व प्रा. स्वाती बिद्री यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. रवी राजूरकर यांनी आभार मानले.