24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeमहाराष्ट्रभाविकांकडून साईचरणी १६ कोटींचे दान

भाविकांकडून साईचरणी १६ कोटींचे दान

अहमदनगर : ‘सबका मालिक एक’ आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणा-या साईबाबांच्या दरबारात दररोज देशभरातील साईभक्त हजेरी लावत असतात आणि साईचरणी भरभरून दान देखील करतात. नाताळच्या सुट्यांनिमित्त शिर्डीत साई दर्शनाला आलेल्या देशभरातील भाविकांच्या वतीने साई चरणी भरभरून दान करण्यात आले असून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईचरणी जवळपास १६ कोटींचे दान केले आहे.

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळ सुटीत सरत्­या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्­वागतानिमित्त आयोजित करण्­यात आलेल्­या शिर्डी महोत्­सवाचे दि. २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक १ जानेवारी २०२४ या कालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्­तांनी साईबाबांच्­या समाधीचे दर्शन घेतले. या कालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्­त झाली असल्­याची माहिती संस्­थानचे प्र. मुख्­य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.

तसेच या कालावधीत साईप्रसादालयात ६ लाखांहून अधिक साईभक्­तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे १ लाख २५ हजारांहून अधिक साईभक्­तांनी अन्­नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ११,१०,६०० लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्­यात आली असून याव्­दारे १ कोटी ४१ लाख ५५ हजार ५०० रुपये प्राप्­त झालेले आहेत. याबरोबरच ७,४६,४०० साईभक्­तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.

असा होतो दानाचा विनियोग
साईबाबा संस्­थानच्­या वतीने प्राप्­त झालेल्­या दानाचा विनियोग हा साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्­णालय, साईप्रसादालय मोफत भोजन, संस्­थानच्­या विविध शैक्षणिक संस्­था, बा रुग्­णांना चॅरिटीकरिता, साईभक्­तांकरिता घेण्­यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामांकरता करण्­यात येत असल्­याचे हुलवळे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR