24.9 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeसोलापूरघरफोडी करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

घरफोडी करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

१३ गुन्हे उघड करून पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सोलापूर – सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी तिघा सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरी घरफोडीचे १३ गुन्हे उघड केले असून त्यांच्याकडून ८ लाख ७० हजार ८१८ रूपयाचा मु द्देमाल हस्तगत केला.

लतिफ ऊर्फ राजेश दारकश काळे (वय ३२, रा. पारगांव, ता. आष्टी, जि. बीड), रवि ऊर्फ वकील्या शौर्याप्पा पवार (वय २८, रा. सोन्याळ, ता. जत, जि. सांगली), शुभम राजु काळे (वय १९, रा. बोचरे वस्ती, वागदरी, करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या तिघां आरोपीची नावे आहेत. यातील लतिफ काळे याला करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आष्टी जि. बीड येथून अटक करून त्याच्याकडून करमाळा, मोहोळ, टेंभुर्णी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी घरफोडीचे १० गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश आले.

त्याच्याकडून ४ लाख ४३ हजार ३१८ रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. हा सराईत गुन्हेगार असून सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रातील करमाळा, मोहोळ, टेंभुर्णी, बार्शी, करकंब या पोलीसठाण्यात दाखल असलेल्या १७ गुन्ह्यात पाहिजे होता. तसेच रवि पवार आणि शुभम काळे या दोघा आर- ोपींना अटक करून त्यांच्याकडून पंढरपूर परिसरातील तीन गुन्हे उघउ करून ४ लाख २७ हजार ५०० रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला असा एकूण ८ लाख ७० हजार ८१८ रूपयाचा मुद्देमाल पोलीसांनी या तिघा आरोपीकडून हस्तगत केला.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो लीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, शशिकांत शेळके, यांच्या पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजा- वर, नारायण गोलेकर, श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, धनाजी गाडे, हरिदास पांढरे, आबासाहेब म ढे, मोहन मनसावाले, सुहास नारायणकर, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, यश देवकते, विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, चालक समीर शेख, सतीश कापरे, प्रदीप चौधरी आदींनी यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR