32.8 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeराष्ट्रीयआयईडी स्फोटात तीन जवान जखमी

आयईडी स्फोटात तीन जवान जखमी

भुवनेश्वर : ओडिशातील बौध आणि कंधमाल जिल्ह्यांच्या सीमेवरील बटेपांगा जंगलात माओवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात तीन स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे (एसओजी) जवान जखमी झाले आहेत. स्फोटाची पुष्टी करताना राज्याचे आयजी ऑपरेशन सुरेश देवदत्त सिंग यांनी सांगितले की, स्फोटात जखमी झालेल्या तीन जवानांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्याचबरोबर शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बौड जिल्ह्यातील मनमुंडा पोलीस ठाण्यांतर्गत बटेपांगा जंगलात केकेबीएन नक्षलवादी संघटनेच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी एसओजी आणि डीव्हीएफ फोर्स शोध मोहिमेसाठी पाठविली होती. सुरक्षा दल शोध मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात तीन जवान जखमी झाले. डिसेंबर महिन्यातही नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान गंभीर जखमी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR