28.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमनोरंजनसुरभी ज्योती लवकरच म्हणणार ‘कुबूल है’

सुरभी ज्योती लवकरच म्हणणार ‘कुबूल है’

मुंबई : सध्या मनोरंजन विश्वातही लगीनघाई सुरू आहे. नुकतीच आमिर खानची मुलगी आयरा खानने नुपूर शिखरेसोबत लग्न केले. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री नववधू होण्यासाठी तयार असल्याच्या चर्चा आहेत. ती अभिनेत्री म्हणजे ‘कुबूल है’ फेम अभिनेत्री सुरभी ज्योती.

सर्वांची लाडकी झोया म्हणजेच सुरभी ज्योती तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीसोबत लग्न करणार आहे. सुरभी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या कामाव्यतिरिक्त लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत राहिली आहे. सुमित सुरीपूर्वी सुरभीचे नाव अभिनेता पर्ल व्ही. पुरीशी जोडले गेले होते. आता सुरभीच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
मीडिया रिपोर्टस्नुसार, सुरभी ज्योती सुमित सुरीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सुमित हा बिझनेसमॅन असण्याबरोबरच अभिनेता आणि निर्माता आहे. सुरभी ब-याच वर्षांपासून सुमितला डेट करत आहे.

सुरभी आणि सुमित हे ६ मार्चला लग्न करणार असल्याचा दावा सुरभीच्या जवळच्या मैत्रिणीने केला आहे. तिच्या लग्नात फक्त कुटुंब आणि मित्र उपस्थित राहणार आहेत सुमित सरीने ‘द टेस्ट केस’ आणि ‘होम’ सारख्या ओटीटी शोमध्ये काम केले आहे. त्याने सुरभीसोबत एका म्युझिक व्हीडीओमध्ये काम केले आहे. २०१८ मध्ये त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सुरभी ज्योती ‘कुबूल है’ मध्ये झोयाची भूमिका साकारून प्रसिद्ध झाली. ‘नागिन’ या मालिकेत तिची आणि पर्ल व्ही. पुरीची केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR