23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रसुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?

सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?

 काँग्रेसचा खोचक सवाल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखं भारतात आणण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली होती. मात्र त्यानंतर अनेक दिवस झाले असले तरी वाघनखे अद्याप महाराष्ट्रात आलेली नाहीत. यावरून आता काँग्रेसने खोचक सवाल विचारला आहे. ‘नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?’ असं म्हणत निशाणा साधला आहे.

वर्ष संपले, २०२४ उजाडले.. आता जानेवारी पण हुकले! वाघनखं काही आली नाहीत… आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार? असे म्हणत हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. ‘नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले. येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले होते.

त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असे तुम्ही सांगितले, तो महिना गेला….. वर्ष संपले, २०२३ उजाडले.. आता जानेवारी पण हुकले! वाघनखं काही आली नाहीत… आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार?’ असे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. शिवस्पर्श झालेली ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील.

ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयांत शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे.

वाघनखे सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात
शिवाजी महाराजांनी १५ नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. अफजलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांना आदिलशाहीला नामोहरम करण्यासाठी बळ मिळाले होते. दरम्यान, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. ती वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR