35.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रदूर तुझसे मैं रहके बता क्या करू?

दूर तुझसे मैं रहके बता क्या करू?

लग्नाच्या वाढदिवशी शरद मोहोळचे पत्नीसाठी स्टेटस

पुणे : पुणे शहरात शुक्रवारी भरदिवसा गोळीबार झाला. चार हल्लेखोरांनी गुंड शरद मोहोळ याची भरदुपारी हत्या केली. विशेष म्हणजे पाच जानेवारी रोजी शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसामुळे त्याच्या कार्यालावर गर्दी झाली होती. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून देवदर्शनासाठी तो कार्यालयाच्या बाहेर पडला. त्यावेळी गर्दीतून पुढे आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळ्या चालवल्या. आता शरद मोहोळ याने ठेवलेले व्हॉट्सऍप स्टेटस व्हायरल झाले आहे. त्यात म्हटले की, ‘दूर तुझसे मैं रहके बता क्या करू?’ गाण्यावर शरद मोहोळ याने पत्नी स्वाती मोहोळ हिला शुभेच्छा दिल्या आहेत. या स्टेटसमध्ये दोघांचा फोटो पोस्ट करून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

शरद मोहोळ याची हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून त्याचा सहकारी साहिल पोळेकर याचे नाव समोर आले आहे. साहिल केवळ सात दिवसांपूर्वीच त्याच्या गँगमध्ये आला होता. त्यानंतर जमिनीच्या आणि पैशांच्या वादातून त्याने शरद मोहोळ याला संपवले.

पत्नीला दिल्या अनोख्या शुभेच्छा
गुंड शरद मोहोळने पोस्ट केलेले व्हॉट्सऍप स्टेटस व्हायरल झाले आहे. ‘ दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? या गाण्यावर त्याने पत्नी स्वाती मोहोळे हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये दोघांचा फोटो पोस्ट करून लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शरद मोहोळ याने हत्येच्या काही वेळापूर्वी व्हॉट्सऍप स्टेटस ठेवले होते. त्यानंतर पुढच्या काही तासांतच त्याच्यावर गोळीबार झाला.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर
शरद मोहोळ याच्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्हीमध्ये शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्याच्या दिसत आहेत. चार राऊंड फायर केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. शनिवारी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. शरद मोहोळ याच्या साथीदारांनी त्याच्यावर गोळीबार केल्याचे दिसत आहे. गोळ्या झाडून त्या ठिकाणावरून त्याच्या साथीदारांनी पळ काढला. आर्थिक व्यवहारातील वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR