राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ जाहीर केले आहेत. यंदा देशातील १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणा-या मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी यंदा एकाही खेळाडूची निवड झालेली नाही.

निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींनुसार या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या खेळांतील खेळाडूंचा समावेश आहे. यात तेजस्विन शंकर, धावपटू मुहम्मद अजमल व्ही आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, बुद्धिबळ खेळाडू विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख यांचा समावेश आहे.

तसेच हॉकीपटू लालरेमसियामी आणि राजकुमार पाल, नेमबाज अखिल श्योराण, पॅरा नेमबाज रुद्रांश खंडेलवाल, पॅरा अ‍ॅथलीट एकता भ्यान, रोइंगपटू अरविंद सिंह, बॉक्सर नरेंद्र, कबड्डीपटू सुरजीत आणि पूजा, तसेच नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. माजी भारतीय फुटबॉलपटू आय. अरुमैनायगम यांना अर्जुन पुरस्काराच्या जीवनगौरव श्रेणीत सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणा-या संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तीन वेळा ड्युरंड कपही जिंकला आहे.

खेलरत्न पुरस्कारासाठी एकही खेळाडू नाही
यंदा सर्वात मोठी बाब म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी एकाही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.गेल्या वर्षी मात्र चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्यामध्ये बुद्धिबळ विश्वविजेता डी. गुकेश, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह, पॅरा अ‍ॅथलीट प्रवीण कुमार आणि ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर यांचा समावेश होता.

प्रशिक्षकांनाही मिळाला सन्मान
द्रोणाचार्य पुरस्काराच्या श्रेणीत अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक परवीर सिंह, बॉक्सिंग प्रशिक्षक छोटेलाल यादव आणि नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांची निवड झाली आहे. तर जीवनगौरव श्रेणीत बॉक्सिंग प्रशिक्षक धर्मेंद्र सिंह यादव आणि कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुण्यातील आर्मी पॅरालॉम्पिक नोडचा सन्मान
क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार यंदा पुण्यातील आर्मी पॅरालॉम्पिक नोड यांना जाहीर करण्यात आला आहे. एकूणच, २०२५ च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये विविध खेळांतील १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मात्र, देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या खेळरत्न पुरस्कारासाठी एकही नाव जाहीर न झाल्याने यंदाचा पुरस्कार सोहळा विशेष चर्चेत आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news