35.4 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना राज्यात सर्वाेत्कृष्ट

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना राज्यात सर्वाेत्कृष्ट

पुणे – प्रतिनिधी :
राज्यातील उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची निवड झाली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. येत्या ११ जानेवारी रोजी होणा-या सभेत इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजी कडू पाटील आणि सल्लागार शिवाजीराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली.

विविध पुरस्कारांमध्ये ऊस भूषण, तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार, आसवनी पुरस्कार, पर्यावरण पुरस्कार, आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
स्व. विलासरावजी देशमुख उद्योजकता पुरस्कार नगर जिल्ह्यातील सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR