भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळ येथील एका बेकायदेशीर शेल्टर होममधून २६ मुली बेपत्ता झाल्या आहेत. शेल्टर होममध्ये गुजरात, झारखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुली राहत होत्या.
राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी पारवालीया भागातील आंच मुलींच्या हॉस्टेलला सरप्राईज भेट दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यांनी जेव्हा रजिस्टर तपासले तेव्हा त्यांना आढळले की ६८ हिंदू मुलींपैकी २६ जणी बेपत्ता आहेत.
प्रियांक यांनी होम शेल्डरचे संस्थापक अनिल मॅथ्यू यांना जेव्हा याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर याप्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, शेल्टर होममध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. ते शेल्टर होम बेकायदेशीरपणे चालवण्यात येत होते.