24.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमुख्य बातम्यासनबर्न फेस्टिव्हलमध्ये सनातन धर्माचा अपमान; अखेर आयोजकांविरोधात कारवाई

सनबर्न फेस्टिव्हलमध्ये सनातन धर्माचा अपमान; अखेर आयोजकांविरोधात कारवाई

पणजी : गोव्यातील सनबर्न ईडीएम फेस्टिव्हल चांगलाच वादात सापडला आहे. सनबर्न फेस्टिव्हलवरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने सनबर्नच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून आयोजकांनी भगवान शंकराचा अवमान केल्याचा आरोप आप आणि काँग्रेसने केला. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी केली आहे.

सनबर्न उत्सव हा प्रसिद्ध नृत्य संगीत महोत्सव आहे. गोव्यात २८ डिसेंबर रोजी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर गोव्यात दणक्यात हा फेस्टिव्हल सुरू होता. ३० डिसेंबर रोजी या फेस्टिव्हलची सांगता झाली. पण या फेस्टिव्हलमधून भगवान शंकराचा अपमान करण्यात आल्याने आम आदमी पार्टी अधिकच आक्रमक झाली आहे. आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी हा मुद्दा लावून धरून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही धारेवर धरले आहे.

दारू पिऊन नाचत होते
या फेस्टिव्हलमध्ये भगवान शंकराच्या प्रतिमेचा वापर करण्यात आला. या फोटोसमोरच लोक दारू पिऊन नृत्य करत होते. एलईडी स्क्रिनवर भगवान शंकराचा फोटो दाखवण्यायत येत होता. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी ही घटना आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन या प्रकाराविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अमित पालेकर यांनी केली.

अखेर कारवाई
दरम्यान, सनबर्न फेस्टिव्हलवरून आप आणि काँग्रेस पार्टी आक्रमक झाल्यानंतर अखेर पोलिसांनी आयोजकांविरोधात कारवाई केली आहे. आयोजकांवर ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली असून आयोजकांना यापुढे असा प्रकार न करण्याची ताकीदही देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR