लातूर : प्रतिनिधी
आई-वडिलांचे छत्र अन् त्यांच्या मायेस पारखे झालेल्या लेकींना आपल्याच मुली म्हणून ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानने आधार दिला. त्यांना घडवले, वाढवले शिकवले अन् त्यांच्या लग्नगाठीही बांधल्या. आपल्या जीवनात अशी आनंदाची शींपन कधी होईल, हे या लेकींना वाटलेही नसावे तथापि ही मानवता मातृ-हदयी हरिश्चंद्र सुडे यांच्या पुढाकारातून वास्तवात आली. या तिन्ही लेकींचे शनिवार दि. ६ जून रोजी विधीवत लग्न लावण्यात आले.
ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.या मुलीशी सुसंस्कृत व चांगल्या घरातील नवयुवकांनी साताजन्माची लगीन गाठ बांधली आहे. अनाथ व दिव्यांग मुलीं-मुलांचे प्रश्न हे खूप गंभीर आहेत. हे जाणून ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था ४२ वर्षापासून ‘दिव्यांग पुनर्वसन उपक्रम’ राबवत आहे. कसलेही कौशल्य नसताना समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकाला स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम ही संस्था मोठ्या निष्ठेने करीत आहे. प्रतिष्ठानच्या पुनर्वसन उपक्रमाच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक स्वावलंबन साधले आहे. संस्थेने आतापर्यंत ६० दिव्यांगावर अक्षता टाकल्या आहेत आता त्यापुढे पाऊल टाकत तीन अनाथ मुलींच्या लग्न गाठी बांधल्या आहेत. त्यांच्या या बांधिलकीने साने गुरुजींना अपेक्षीत असलेले दरम्यान लग्न कार्य यशस्वीतेसाठी हरिश्चंद्र सुडे, कमलाकर सावंत, रवीचंद्र वंजारे, वैशाली राठोड, शिवशंकर बरबडे व सर्व कर्मचारी-यांनी परिश्रम घेतले.