22.8 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरनिलंग्यात चार ठिकाणी जुगारावर छापेमारी

निलंग्यात चार ठिकाणी जुगारावर छापेमारी

लातूर : प्रतिनिधी
उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर निलंगा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी चालणा-या मटका जूगारावर एकाच वेळी विविध पथके तयार करून कारवाई करण्यात आली असून या कारवाईत ३३ व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आली आहेत तर २ लाख ९४ हजार रूपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.

दि. ४ जानेवारी रोजी निलंगा येथे वेगवेगळ्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये, तसेच रूम मध्ये काही इसम मटका नावाचा जुगार खेळत आहेत. अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांनी निलंगा येथील शिवाजी चौक ते बँक कॉलनी जाणारे रोडवर, बँक कॉलनी परिसरात, औराद ते निलंगा जाणारे रोडवरील परिसरात, पिराजी नवनाथ कांबळे यांचे पत्र्याच्या घरामध्ये अशा चार ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून बेकायेशीररित्या मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने एकूण ३३ इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ९४ हजार ५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे निलंगा मध्ये खालील नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चा कलम १२(अ) कायद्यान्वये प्रमाणे ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात माजिद अब्दुलगणी खडके, वय ३५ वर्ष, राहणार इरिगेशन ऑफिस समोर शिवाजीनगर निलंगा, बालाजी प्रभू गायकवाड, ४८ वर्ष, राहणार जेवरी, तालुका निलंगा, भगवान माधव वाडीकर, वय ४२ वर्ष, राहणार मसोबाचीवाडी तालुका निलंगा, समदानी जाफर सौदागर, वय ४० वर्ष, राहणार शिवाजीनगर चांदसाबी मोहल्ला, निलंगा, शहाबाद उस्मान पठाण, वय २१ वर्ष, राहणार बागवान गल्ली पीरपाशा रोड, निलंगा. इरफान शेख, राहणार निलंगा, वाजिद रुक्मोदिन पठाण, वय ४० वर्ष, राहणार समता नगर, मुबारकपूर निलंगा, ज्ञानोबा बाजीराव गवारे, ७० वर्ष, राहणार केळगाव, तालुका निलंगा, ज्ञानेश्वर मल्हारी त्रिमुखे, २९ वर्ष राहणार पेठ निलंगा रियाज नुरुद्दीन कुरेशी, वय २९ वर्ष, राहणार शिवाजीनगर,निलंगा, नितीन यादव कांबळे, वय २६ वर्ष, राहणार शिवाजीनगर ,निलंगा.ऋषिकेश लक्ष्मण कांबळे, वय २२ वर्ष, राहणार रामेगाव, तालुका औसा, विशाल अंकुश कांबळे, राहणार पेठ निलंगा,

अख्तर रुक्मुद्दीन फकीर, वय ४५ वर्ष,राहणार पीरपाशा दर्गा रोड, निलंगा, महबूब रुक्मुद्दीन फकीर, वय ५५ वर्ष, राहणार पीरपाशा दर्गा रोड, निलंगा, विठ्ठल व्यंकटराव माने, वय ५५ वर्ष राहणार, अंतरवाडा तालुका निलंगा, कृष्णा शिवाजी पोतदार, वय २७ वर्ष, राहणार बँक कॉलनी, निलंगा, उल्हास शिवलिंगप्पा दिवटे, वय ५० वर्षे, राहणार दुर्गा नगर, महारुद्र चौक, निलंगा, विक्रम किशनराव शेंडगे, वय ३३ वर्ष, राहणार गांधीनगर, निलंगा, शंकर गोपाळ हिरास, वय २७ वर्ष, राहणार महारुद्र चौक, निलंगा, संदीप सुरेश गाडचिले, वय २७ वर्ष, राहणार हनुमंतवाडी तालुका निलंगा, उद्धव राजाराम पवार,वय ५५ वर्ष राहणार, जामगाव तालुका निलंगा, लक्ष्मण श्रीपती बोयेने, वय ६० वर्ष, राहणार लिंबाळा, तालुका निलंगा, शाम वसंत वरंगले, ३० वर्ष, राहणार जाऊवाडी, तालुका निलंगा, टिल्लू नीला, राहणार आदर्श कॉलनी निलंगा, संतोष भगवान कांबळे वय ४५ वर्ष, राहणार वीर लहुजी साळवे नगर, निलंगा, सागर रामू क्षीरसागर, वय ३२ वर्ष, राहणार वीर लहुजी साळवे नगर, निलंगा, ज्ञानेश्वर राम सुरवसे, २९ वर्ष, राहणार सिंदखेड तालुका निलंगा, विलास निवृत्ती शेळके, वय ५० वर्ष, राहणार रामेगाव तालुका औसा, महादेव शिवाजी मदने, वय २५ वर्ष, राहणार माळी गल्ली, निलंगा, भीमा राजेंद्र कांबळे, वय २८ वर्ष, राहणार वीर लहुजी साळवे नगर, निलंगा, अनिल पुरुषोत्तम नूतन नवरे, वय ५० वर्ष राहणार इंद्रा चौक, निलंगा, संतोष महादेव कांबळे, वय ३५ वर्ष, राहणार वीर लहुजी साळवे नगर, निलंगा असे असून वरील आरोपी मटका नावाचा जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणा-यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दि.४ रोजी पोलीस ठाणे निलंगा येथे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अधिकारी,अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे. पुढील तपास निलंगा पोलिस करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR