नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने लॉरेन्स बिष्णोई गँगला शनिवार दि. ६ जानेवारी रोजी चांगलाच दणका दिला. गुन्हेगारी कृत्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई या गँगच्या सदस्यांच्या ४ मालमत्ता एनआयएने जप्त केल्या आहेत. ही कारवाई देशातील दहशतावादी आणि स्मगलरांना उद्वस्थ करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे, असे ‘एनआयए’कडून सांगण्यात आले आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये तीन राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हरियाणा, पंजाब आणि उत्तरप्रदेशमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये एका स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. तर इतर ३ जंगम मालमत्ताही ‘एनआयए’ने जप्त केल्या आहेत. ही मालमत्ता दहशतवादाच्या साहाय्याने मिळवलेली होती. या मालमत्तेतून येथून पुढेही दहशतवादी कारवायाच होणार होत्या. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत लखनौमधील एका फ्लॅटचाही समावेश आहे. या फ्लॅटमध्ये उत्तरप्रदेशातील दहशतवादी विकास सिंहने आश्रय घेतला होता.
पंजाबमधूनही संपत्ती जप्त
याशिवाय पंजाबमधून काही मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. फाल्जिकामधील बिशनपुरामध्ये ही संपत्ती आहे. आरोपी दिलीप कुमार उर्फ दिलीप बिश्नोईकडे पंजाबमधील संपत्तीची मालकी होती. तपासाचा हवाला देत एनआयएचे अधिकाऱ्याने विकास सिंह हा लॉरेंन्स बिष्णोई गँगचा सहकारी असल्याचे म्हटले आहे. त्याचा पंजाब पोलीस मुख्यालयावर झालेल्या ग्रॅनेट हल्ल्यामध्ये सहभाग होता.
शस्त्रसाठी लपवण्यासाठी स्थावर मालमत्तेचा वापर
एनआयएच्या माहितीनुसार, लॉरेंन्स बिश्नोई गँगचे निकटवर्तीय असलेले काला राणाचे वडिल जोगिंदर सिंह दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शस्त्रांच्या वाहतुकीस साहाय्य करतात. याशिवाय या संपत्तीचा वापर दहशतवाद्यांना लपवण्यासाठी, शस्त्रसाठा ठेवण्यासाठी केला जातो.