नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. आता पुन्हा धोनीचा आणखी एक व्हीडीओ व्हायरल झाला. या व्हीडीओमध्ये कॅप्टन कूल धोनी हुक्का पिताना दिसत आहे.
हा व्हीडीओ खूप व्हायरल झाला असून तुफान चर्चेत आहे. या व्हीडीओवर नेटक-यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकरी धोनीवर टीका करताना तर काही नेटकरी धोनीला पाठिंबा देताना दिसत आहेत.
धोनीचे असंख्य चाहते त्याच्याबद्दलची एक अपडेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. मैदान गाजवणारा धोनी मैदानाबाहेर खूप साधं जीवन जगतो. त्याचा हाच अंदाज चाहत्यांना जास्त आवडतो.
या व्हायरल व्हीडीओमध्ये धोनी लाँग हेअर लूक आणि टिप-टॉप ब्लेझरमध्ये दिसत आहे. या व्हीडीओमध्ये धोनीसोबत इतरही अनेक लोक दिसत आहेत. व्हीडीओ पाहून हा एखाद्या पार्टीमधील असल्याचं दिसत आहे. यावेळी धोनीच्या हातात हुक्का दिसत आहे. व्हीडीओमध्ये धोनी हुक्का पिऊन तोंडातून धूर सोडताना दिसत आहे.